घरबसल्या Freelancing करून पैसे कसे कमवायचे – संपूर्ण मार्गदर्शन
प्रस्तावना :-
मित्रानो काल आपण घरबसल्या पैसे कसे कमवायचे, त्याचे 5 मार्ग आपण पाहिलेत. आजपासून दररोज एक एक करून त्यातील 5 ही मार्ग थोडस सविस्तर पाहणार आहोत. जेणेकरून तुम्हाला सुरवात करणे सोपे होऊन जाईल. कोणताही एक मार्ग निवडल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या असतात, आपल्यामध्ये कोणते कौशल्य असायला पाहिजे हे आजच्या ब्लॉग मधून आपण सविस्तर पाहणार आहोत. चाला तर मग सुरवात करूया...
Freelancing म्हणजे काय...?
कसं सुरू करायचं...?
किती कमाई...?
Freelancing म्हणजे तुमच्या कौशल्यातून घरबसल्या पैसे कमावण्याचा एक सोपा मार्ग आहे. आजकाल अनेक लोक नोकरीसोबत किंवा पूर्ण वेळ Freelancing करून चांगली कमाई करत आहेत. आपल्यालाही वेळ भेटत असेल किंवा करायची इच्छा असेल तर नक्की करू शकता.
त्यासाठी तुमच्याकडं मोबाईल किंवा लॅपटॉप आणि इंटरनेट असेल तर तुम्हीही Freelancing सुरू करता येईल.
अगोदरच्या काळात पैसे कमवणे इतक सोप नव्हतं, त्यासाठी दिवसभर कष्ट करावे लागायचे. पण, आजच्या काळात मोबाईल आणि इंटरनेटच्या मदतीने घरबसल्या पैसे कमावणे शक्य झाले आहे. त्यातील सर्वात सोपा आणि लोकप्रिय मार्ग म्हणजे Freelancing हा आहे.
Freelancing म्हणजे तुम्ही कोणाच्या कंपनीत नोकरी न करता तुमच्या कौशल्यावर काम करून पैसे कमावता. आपल्याकडं कोणत्या प्रकारच कौशल्य आहे ते तपासा.
जर तुम्हाला खालीलपैकी काही जमत असेल तर तुम्ही आजपासून Freelancing सुरू करू शकता:
✔ लेखन (Blog Writing)
✔ व्हिडिओ एडिटिंग
✔ फोटो एडिटिंग
✔ ग्राफिक डिझाईन
✔ सोशल मीडिया पोस्ट बनवणे
✔ Data Entry
✔ YouTube Thumbnail बनवणे
तुम्हाला मोबाईलवरून सुद्धा Freelancing सुरू करता येईल.
Freelancing म्हणजे नेमकं काय?
समजा एखाद्या YouTuber ला Thumbnail बनवायचा आहे. तुम्ही त्याला घरी बसून बनवून देऊ शकता.
त्याच्या बदल्यात तो तुम्हाला ₹100 देईल Thumbnail बनवायला.
तुम्ही घरबसल्या काम करून पैसे कमवाल.
यालाच Freelancing असं म्हणतात.
Freelancing सुरू कसं करायचं?
Step 1 – तुमची Skill ठरवा
तुमच्या स्किल नुसार पहिल्यांदा तुम्हाला काय जमतं ते ठरवा.
उदाहरण:
मोबाईलवर व्हिडिओ एडिटिंग
फोटो एडिटिंग
Writing
Thumbnail बनवणे
वरीलपैकी एकच Skill निवडा.
Step 2 – Fiverr किंवा Upwork वर अकाउंट तयार करा
Google मध्ये search करा:
Fiverr signup
Upwork signup
Account तयार करा.
तुमचं नाव आणि Skill लिहा.
उदाहरण:
Video Editor
Thumbnail Designer
Blog Writer
Step 3 – तुमचे Sample तयार करा
कोणी ही तुम्हाला काम देण्यापूर्वी तुम्ही तयार केलेले Sample बघतो.
उदाहरण:
5 Thumbnail बनवा
2 व्हिडिओ एडिट करा
2 Blog लिहा
हे Sample upload करा.
Step 4 – छोट्या कामांपासून सुरुवात करा
सुरुवातीला कमी पैसे घ्या.
उदाहरण:
Thumbnail = ₹50
Video Editing = ₹200
Rating मिळाल्यावर पैसे वाढवा.
Freelancing मध्ये किती पैसे मिळतात?
Freelancing चे भविष्य
येणाऱ्या काळात Freelancing खूप वाढणार आहे. अनेक कंपन्या आता कायम कर्मचारी ठेवण्याऐवजी Freelancers कडून काम करून घेत आहेत. त्यामुळं त्यांना कर्मचाऱ्यांना फिक्स पगार द्यावा लागत नाही. या उलट Freelancing मध्ये जेवढे काम तेवढेच पैसे द्यावे लागतात. म्हणून हे भविष्यातील एक मोठं कमाईचं साधन बनू शकतं.
सुरुवातीला:
₹5,000 ते ₹20,000 महिना कमावू शकता.
अनुभव वाढला की:
₹50,000 किंवा जास्त सुद्धा कमावता येतात. भरपूर लोक कमवत आहेत.
Freelancing चे फायदे
✔ घरबसल्या काम
✔ मोबाईलवर काम शक्य
✔ स्वतःचा वेळ
✔ कमी खर्च
✔ जास्त कमाईची संधी
Freelancing मध्ये यशस्वी होण्यासाठी टिप्स
✔ रोज 1 तास शिकत
✔ YouTube वर नवीन गोष्टी शिका
✔ ग्राहकांशी नीट बोला
✔ वेळेत काम पूर्ण क
निष्कर्ष
Freelancing हा घरबसल्या पैसे कमावण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. जर तुम्ही आजपासून सुरुवात केली तर काही महिन्यांत चांगली कमाई सुरू होऊ शकते. मी ही सुरु केलोय तुम्ही ही सुरु करा.
छोट्या कामांपासून सुरुवात करा आणि हळूहळू मोठे काम घ्या
आजच Freelancing सुरू करा आणि तुमच्या कौशल्यातून पैसे कमवा...
अशाच Online Earning माहिती साठी Vision Health & Wealth ब्लॉग Follow करा. शेअर करा...
आता तुम्ही पण घरबसल्या 5 सोप्या मार्गाने पैसे कमवू शकता.
आता तुम्ही ही घरबसल्या डेटा एन्ट्री करून पैसे कसे कमवायचे ? संपूर्ण मार्गदर्शन

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा