जास्त विचार करण्याची सवय (Overthinking) कशी थांबवावी? मन शांत ठेवण्यासाठी 7 प्रभावी उपाय (2026 Guide)

जास्त विचार करण्याची सवय.


प्रस्तावना

आजकाल अनेक लोक एकाच समस्येमुळे त्रस्त आहेत – जास्त विचार करण्याची सवय. छोट्या छोट्या गोष्टींचा खूप विचार करणे, भूतकाळात झालेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवणे, भविष्यात काय होईल याची सतत चिंता करणे… ही सवय हळूहळू मन थकवायला लागते. अशाने आपण डिप्रेशन मध्ये जातो.

अनेक वेळा लोकांना हे कळतही नाही की ते overthinking करत आहेत. त्यांना वाटतं की ते फक्त विचार करत आहेत. पण जेव्हा विचार जास्त होतात तेव्हा मन शांत राहत नाही, confidence कमी होतो आणि काम करण्याची इच्छा सुद्धा कमी होते.

Overthinking म्हणजे नेमकं काय?

Overthinking म्हणजे एखाद्या गोष्टीचा आवश्यकतेपेक्षा जास्त विचार करणे. उदाहरणार्थ, एखाद्याने आपल्याशी नीट बोललं नाही तर आपण लगेच विचार करायला लागतो – “मी काही चूक केली का?”, “त्याला माझ्याबद्दल वाईट वाटत असेल का?”, “लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील?” यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींचा जाणूनबुजून किंवा कळत नकळत सारखा विचार करत असतोत.

अशा प्रकारे एक छोटी गोष्ट मोठी बनते. आणि हळूहळू मनावर ताण वाढायला लागतो. हेच overthinking चं खरं लक्षण आहे.

जास्त विचार करण्याची सवय का लागते?

अनेक लोकांना वाटतं की overthinking ही फक्त सवय आहे. पण त्यामागे काही खऱ्या कारणे असतात. सर्वात मोठं कारण म्हणजे आत्मविश्वास कमी असणे. जेव्हा माणूस स्वतःवर विश्वास ठेवत नाही तेव्हा तो प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करायला लागतो.

दुसरं कारण म्हणजे भूतकाळात झालेल्या चुका. एखादी चूक झाल्यावर काही लोक ती विसरतात. पण काही लोक ती पुन्हा पुन्हा आठवतात. त्यामुळे मन सतत ताणाखाली राहतं. व त्यांचे त्यांनाच कळत नाही की ते कधी पासून ओव्हरथिकिंग करायला लागले.

Overthinking मुळे काय नुकसान होतं?


Overthinking मुळे काय नुकसान होतं?

जास्त विचार केल्यामुळे सर्वात आधी confidence कमी होतो. कारण मन सतत negative विचार करत राहतं. दुसरं म्हणजे काम करण्याची इच्छा कमी होते. कारण आपण काम सुरू करण्याआधीच त्याचा result काय येईल याचा विचार करायला लागतो. त्या विचारातच आपण कामाला सुरवात पण करत नाही. काय होईल, कस होईल, याचीच चिंता जास्त करतो.

तिसरं मोठं नुकसान म्हणजे झोपेवर परिणाम होतो. रात्री झोपण्याचा प्रयत्न करत असताना डोक्यात सतत विचार चालू राहतात. त्यामुळे झोप लागत नाही आणि दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो.

झोप पूर्ण न झाल्याने शरीर थकते, त्याचे वाईट परिणार शरीरावर पण होतात, आपली तब्बेत बिघडते.

Overthinking कशी थांबवावी?

Overthinking थांबवण्यासाठी मोठे बदल करण्याची गरज नसते. फक्त काही छोट्या सवयी बदलल्या तरी खूप फरक दिसू शकतो.

सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा – प्रत्येक विचार खरा नसतो. आपल्या मनात, डोक्यात दररोज हजारो विचार येत असतात. काही विचार फक्त आपल्या मनाने तयार केलेले असतात. त्यामुळे प्रत्येक विचारावर विश्वास ठेवू नका.

दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला कामात व्यस्त ठेवा. एक हिंदी म्हण आहे ना खाली दिमाग शैतान का घर होता है. रिकामं मन जास्त विचार करायला सुरुवात करतं. त्यामुळे काहीतरी productive काम सुरू केल्यावर overthinking कमी होते.

मन शांत ठेवण्यासाठी 3 सोपे उपाय

पहिला उपाय – मोबाईलचा वापर कमी करा. कारण सोशल मीडियावर इतर लोकांचे life पाहून आपण स्वतःची तुलना करायला लागतो. त्यामुळे negative विचार वाढतात. आणी तस पण आपण जी त्यांची लाईफ पाहतो ती खरोखर तशाप्रकारची नसते.

दुसरा उपाय – रोज 10 मिनिटे शांत बसा. काहीही विचार करू नका. फक्त श्वासावर लक्ष द्या. हा उपाय मन शांत करण्यासाठी खूप उपयोगी आहे.

तिसरा उपाय – स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. प्रत्येक गोष्ट perfect होणार नाही, हे स्वीकारलं की overthinking आपोआप कमी होतं. किंवा या दुनियेत 100 % गोष्टी कोणाच्याही मनासारख्या होत नसतात. हे सत्य कळलं की ओव्हरथिंकिंग ला जागाच  उरत नाही.

निष्कर्ष

जास्त विचार करण्याची सवय एका दिवसात थांबत नाही. पण जर तुम्ही आजपासून छोटी छोटी सवयी बदलायला सुरू केल्या तर हळूहळू मन शांत व्हायला लागेल.

लक्षात ठेवा – विचार करणं चुकीचं नाही, पण जास्त विचार करणं आयुष्य थांबवू शकतं. त्यामुळे आजपासून overthinking थांबवण्याची सुरुवात करा.



FAQ

प्र. Overthinking थांबवण्यासाठी काय करावं?

मोबाईल कमी वापरा, स्वतःला कामात व्यस्त ठेवा आणि negative विचारांवर विश्वास ठेवू नका.

प्र. Overthinking मुळे confidence कमी होतो का?

हो, जास्त विचार केल्यामुळे confidence कमी होतो आणि मनावर ताण वाढतो.


20 वर्षांपूर्वीचं अन्न vs आजचं अन्न – आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम होत आहे? (2026 Reality)

आयुष्य बदलणारी खरी गोष्ट, जी तुमचं आयुष्य बदलू शकते.

कंटाळा येतोय...? तुमच्या मेंदूतील हे 10 बदल थांबवा..., उत्साह मिळवा

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लहान मूल रडतंय म्हणून मोबाईल लावून देणारे पालक – तुम्ही कळत नकळत त्या लेकराचं आरोग्य आणि आयुष्यच बरबाद करत आहात

🧠 AI चुकिची माहिती देऊ शकतो का? | Is AI Safe in 2026? (सत्य जे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे)

Chemical शेतीमुळे अन्नात काय बदल झाले? आणि त्याचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? (2026 Reality Blog)