पाणी पिण्याचे 10 फायदे – निरोगी शरीरासाठी रोज पाणी का आवश्यक आहे?
पाणी पिण्याचे 10 फायदे – निरोगी शरीरासाठी रोज पाणी का आवश्यक आहे?
आपण सर्वजण दररोज पाणी पितो, पण आपल्याला माहिती आहे का...? आपल्या शरीराला दररोज किती पाणी लागते, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर कशाप्रकारे होतो. पाणी हे आपल्या शरीरासाठी सर्वात आवश्यक घटक आहे. अन्नाशिवाय काही दिवस राहता येते, पण पाण्याशिवाय शरीर व्यवस्थित कार्य करू शकत नाही. आपल्या शरीरातील सुमारे 60% भाग पाण्याचा बनलेला असतो, त्यामुळे रोज पुरेसे पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे.
आजकाल अनेक लोक कमी पाणी पितात आणि त्यामुळे थकवा, डोकेदुखी, अपचन, त्वचेच्या समस्या अशा अनेक अडचणी निर्माण होतात.
दररोज योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीर निरोगी आणि ताजेतवाने राहते.
चला जाणून घेऊया पाणी पिण्याचे 10 जबरदस्त फायदे.
1. शरीराला ऊर्जा मिळते
पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते.
पाणी कमी प्यायल्यास शरीर लवकर थकते आणि काम करण्याची इच्छा कमी होते.
पाणी शरीरातील पेशींना ऊर्जा देण्याचे काम करते. त्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते.
जास्त काम करणारे लोक, विद्यार्थी आणि मेहनत करणारे लोकांनी त्यांच्या शरीराच्या योग्य प्रमाणात पाणी पिले पाहिजे.
2. त्वचा ताजी व सुंदर राहते
पाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
रोज पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार होते आणि कोरडेपणा कमी होतो.
पाणी शरीरातील घाण बाहेर टाकते त्यामुळे त्वचा निरोगी राहते.
पुरेसे पाणी पिणारे लोक जास्त तरुण दिसतात. त्यांची त्वच्या हेल्दी व चमकदार दिसते.
3. पचनक्रिया सुधारते
पाणी पचनासाठी अत्यंत आवश्यक आहे.
पाणी अन्न पचवण्यास मदत करते.
पाणी कमी प्यायल्यास बद्धकोष्ठता (कब्ज) होऊ शकते.
रोज सकाळी कोमट पाणी प्यायल्यास पचन चांगले होते.
पोटाचे आजार कमी होतात.
4. शरीराचे तापमान नियंत्रित राहते
पाणी शरीराचे तापमान संतुलित ठेवते.
उन्हाळ्यात पाणी शरीराला थंड ठेवते. त्यामुळे भरपूर पाणी पिणे गरजेचे असते.
घाम येताना शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे पाणी पिणे आवश्यक आहे.
व्यायाम करणाऱ्या लोकांनी जास्त पाणी प्यावे.
5. वजन कमी होण्यास मदत होते
पाणी वजन कमी करण्यात मदत करते.
जेवणाआधी पाणी प्यायल्यास भूक कमी लागते.
जास्त खाणे टाळले जाते.
यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
जेवण चांगल्या प्रकारे पचन होतो.
6. रोगप्रतिकारक शक्ती वाढते
पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते.
यामुळे शरीर स्वच्छ राहते.
शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.
वारंवार आजारी पडणाऱ्या लोकांनी जास्त पाणी प्यावे.
जास्त पाणी पिल्याने शरीर साफ राहण्यास मदत होते.
7. शारीरिक हालचाल सुलभ होते
पाणी सांधे आणि स्नायूंना लवचिक ठेवते.
पाणी कमी प्यायल्यास शरीर आखडते.
हाडे आणि सांधे व्यवस्थित काम करण्यासाठी पाणी आवश्यक आहे.
व्यायाम, शरीरिक मेहनत करणाऱ्या लोकांसाठी पाणी खूप आवश्यक आहे.
8. स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते
पाणी मेंदूसाठी खूप महत्त्वाचे आहे.
पाणी कमी प्यायल्यास लक्ष केंद्रित होत नाही.
विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना पाणी प्यावे.
पाणी प्यायल्याने विचार करण्याची क्षमता वाढते.
9. स्नायू मजबूत होतात
पाणी स्नायूंच्या वाढीस मदत करते.
पाणी शरीरातील रक्तप्रवाह सुधारते.
यामुळे स्नायूंना पोषण मिळते.
शारीरिक मेहनत करणाऱ्या लोकांसाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे.
10. दातांचे आरोग्य टिकून राहते
पाणी तोंड स्वच्छ ठेवते.
तोंडातील जंतू कमी होतात.
दात निरोगी राहतात.
तोंडाला दुर्गंधी येत नाही.
दिवसातून किती पाणी प्यावे?
तज्ञांच्या मते दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे.
सकाळी उठल्यावर 1 ग्लास
जेवणानंतर पाणी
काम करताना पाणी
झोपण्याआधी थोडे पाणी
पाणी कमी प्यायल्यास होणारे नुकसान
जर आपण कमी पाणी प्यायलो तर:
डोकेदुखी होते
थकवा येतो
त्वचा कोरडी होते
बद्धकोष्ठता होते
मूत्रपिंडावर परिणाम होतो
निष्कर्ष
पाणी हे जीवन आहे. रोज पुरेसे पाणी पिणे ही सर्वात सोपी आणि स्वस्त आरोग्याची सवय आहे.
दररोज पाणी प्यायल्याने शरीर निरोगी राहते, त्वचा सुंदर राहते आणि ऊर्जा टिकून राहते.
म्हणून आजपासून शारीरावर होणारे नुकसान टाळण्यासाठी रोज पुरेसे पाणी पिण्याची सवय लावा.
व तुम्ही दरोराज किती पाणी पिता कमेंट मध्ये सांगा.
हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही दिवसातून किती पाणी पिता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा